चामोर्शीत म्हैस पडली नाल्यात,मानवांचे व प्राण्यांचे जीव धोक्यात

0
 चामोर्शीत म्हैस पडली नाल्यात,मानवांचे व प्राण्यांचे जीव धोक्यात 



पुलियांचे पॅकिंग तातडीने करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे बांधकाम विभागाला निवेदन


वैनगंगा वार्ता १९

चामोर्शी : नवीन बसस्थानक परिसरात सुमारे दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या रस्ते व पुलिया बांधकामातील काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने त्याचा फटका जनावरांना बसत असल्याचे समोर आले आहे. पुलियांच्या नाल्यावरील भागावर पाट्या पूर्णपणे पॅक न केल्यामुळे या ठिकाणी जनावरे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता यशोधरा विद्यालयासमोर देवराव नैताम यांच्या मालकीची म्हैस नाल्यात पडली. म्हशीला बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अखेर जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न करून म्हशीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अपूर्ण पुलिया व उघडे नाले भविष्यात जनावरांसह नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकतात, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

दरम्यान, या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी 
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना निवेदन देण्यात आले.पुलियांच्या उघड्या भागावर तातडीने पाट्या लावून पॅकिंग करावे, अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि भविष्यात जनावरे पडून दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना शिंदे गट चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख विक्की वालदे, सदस्य राहुल चिचघरे, अश्विन बोदलकार यांच्यासह चामोर्शीतील अनेक नागरिक व गावकरी उपस्थित होते.

जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !