सर्वांगीण विकास करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजनांचे मूल्य जपणे अत्यंत आवश्यक - प्रा. सुबोध साखरे

0
सर्वांगीण विकास करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजनांचे मूल्य जपणे अत्यंत आवश्यक - प्रा. सुबोध साखरे 


श्री सद् गुरु  साईबाबा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा 



वैनगंगा वार्ता १९
आष्टी (अशोक खंडारे):-
श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. के. सिंग, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुबोध साखरे,रसायनशास्त्र विभाग, डॉ. अपर्णा मारगोनवार,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, आयोजक डॉ. सोनाली धवस रासेयो कार्यक्रम अधिकारी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजना गीत ने करण्यात आली. आपला सर्वांगीण विकास करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजना चे मूल्य जपणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा. सुबोध साखरे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट, समाजसेवेचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण आणि सेवाभाव निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंसेवकांनी विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. के सिंग यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सोनाली धवस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन सदन व सेजल तावाडे तर आभारप्रदर्शन विक्रम सिकदर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद डॉ. दिपक नागापुरे, प्रा.महेशकुमार सिलमवार, प्रा.सचिन मुरकुटे, प्रा. जया रोकडे, प्रा.कविंद्र साखरे, प्रा.राहुल आवारी, प्रा. रवींद्र भुरसे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र झाडे, सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर, उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे, नितु शेंडे आदी सहकार्य केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !