कलाकारांच्या मानधनात वाढ झाली तरच झाडीपट्टी रंगभूमी सातत्याने पुढे जाईल – महेंद्र ब्राह्मणवाडे
गडचिरोली — कलाकारांच्या मानधनात वाढ झाली तरच झाडीपट्टी रंगभूमी सातत्याने पुढे जाईल असे प्रतिपादन 'लग्नपाठ ' या नाटकाचे विमोचन सोहळ्यात केले झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून या रंगभूमीने अनेक दर्जेदार कलाकार घडवून त्यांना चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचविले आहे. आजही हजारो कलाकार व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह झाडीपट्टी नाट्यकलेवर अवलंबून आहे. त्यामुळे ही नाट्यभूमी जिवंत राहणे अत्यंत आवश्यक असून झाडीपट्टीतील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात शासनाने वाढ करावी, असे मत जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.
ओम शिव ओम साई कला रंगभूमीद्वारे संचालित वेदांत नाट्यकला मंच प्रस्तुत ‘लग्नपाठ' या विमोचन सोहळ्यात माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी यांच्या सह धानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, जावेद खान, नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर, तसेच कलाकार के. रविकुमार, प्रभाकर गडपायले, राज बोबाटे, प्रशांत चौधरी, करण मंगमोडे, प्रफुल भरडकर, किशोर कापगते, प्रफुल किलनाके आणि महिला कलाकार लता निंदेकर, सुप्रिया मोटघरे, अश्विनी व रेश्मा रंभाळ यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.

