शहराच्या विकासासाठी हक्काने माझ्याकडे या, जे काही मतभेद आहेत ते सर्व विसरा - खा.प्रतिभा धानोरकरांची साद!
चंद्रपूर:-
महानगरपालिका येथील आयोजित पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा सल्ला दिला. काँग्रेस नगरसेवकांना समान विकास निधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी हातभार लावावा, असे त्या म्हणाल्या.
खा. प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या की, सर्व महानगरपालिका क्षेत्रात सर्वंकष विकास साधण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी विकासाचे राजकारण करावे. आपल्या क्षेत्रातील नागरी समस्या सोडवण्यासाठी व विकासकामांसाठी सर्वांना समान व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे मनात कोणतीही कटुता न ठेवता सर्वांनी माझ्याकडे हक्काने यावे आणि शहराच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात आमदार सुधाकर अडबाले म्हणाले कि, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सुरेंद्र अडबाले यांच्या रूपाने एक सक्षम, अभ्यासू आणि सर्वांगीण नेतृत्व मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नवनियुक्त गटनेते सुरेंद्र अडबाले यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याला काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, नगरसेवक पप्पू देशमुख, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, उपसभापती साईदा ताजू शेख, झोन सभापती रामनरेश यादव, झोन सभापती वैशाली चंदनखेडे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर, माजी शहर अध्यक्ष संतोष लहामगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, सुभाष गौर, शामकांत थेरे, प्रवीण काकडे, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक विनोद लभाने, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक आकाश मानकर, तसेच नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेविका महानंदा वाडके, नगरसेविका सोनिया उंदीरवाडे, नगरसेविका अनिता चौके, नगरसेविका करुणा चालखुरे, नगरसेविका शिला सिडाम, नगरसेविका मनीषा बोबडे, नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

