सोलापूर येथील महामोर्चात सांगोला व मंगळवेढा तालुक्यातून दहा हजार समाज बांधव होणार सहभागी
सांगोला /मंगळवेढा (अशोक खंडारे):-
सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सोलापूर येथे निघणाऱ्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात सांगोला व मंगळवेढा तालुक्यातून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 58 जातीतील दहा हजार समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे निमंत्रक अनंतराव काटे व डी. के. साखरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दिनांक 27 जुलै रोजी निघणारा मोर्चा हा कोणत्याही विशिष्ट जाती धर्माविरुद्ध नसून संविधानाला छेद देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. या मोर्चास सांगोला व मंगळवेढा तालुक्यातून अंदाजे 200 चार चाकी ( फोर व्हिलर ) गाड्या निघणार असून या मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक, महिला व अबाल वृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही काटे व साखरे यांनी केले आहे.

