तुटलेल्या विद्यूत तारेच्या स्पर्शाने जागेवरच बैल झाले ठार
ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याची फार मोठी नुकसान
कढोली:- येथे शेतशिवारात तुटलेल्या विद्यूत तारेच्या स्पर्शाने जागेवरच बैल ठार झाल्याची घटना आज दि.३१ जुलैला सकाळी दहा वाजता घडली
सदर बैल कार्तीक वसंत टेभुर्णे यांच्या मालकिचे असून सकाळी चरायला सोडले असता सती नदी पलिकडे असलेल्या शेतात चरत असतांना जिवंत तुटलेला विद्यूत तारेच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू झाला.
हि माहिती मिळताच बैल मालकाने घटणास्थळी धाव घेतली त्यानंतर त्याने विज वितरण कंपनी कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी यांना माहिती दिली.
माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी वर्षा किरंगे तसेच तलाठी प्रशांत मेश्राम,पो.पाटील राजेंद्र आकरे आणि वीज विभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पंचनामा दरम्यान बैलाची किमंत ४० हजार रुपये ठरवण्यात आली. समोरील अहवाल तालुका प्रशासनाला पाठवण्यात आले असून बैल मालकाला विज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

