अखेर डोंगरगावच्या यात्रेवर शिक्कामोर्तब ,बोकडांचा नैवेद्य शुक्रवारीच
डोंगरगाव तालुका मंगळवेढा - जुलै 2023 मध्ये आयपीएस अधिकारी नयोमी साटम मॅडम, तहसीलदार मदन जाधव व डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये डोंगरगाव ची यात्रा आषाढ महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवसाची करण्याचा ठराव पारित झाला असून गुरुवारी गोडाचा नैवेद्य व शुक्रवारी बोकडांचा नैवेद्य करण्याचे प्रोसिडींग असून त्यावरती शंकर रामचंद्र मेटकरी, शिवाजी दाजी जाधव, यशवंत ज्ञानोबा आकळे यांच्यासह गावातील अन्य प्रमुख व्यक्तींच्या सह्या आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून कांही विघ्नसंतोषी व्यक्तींनी सदरच्या प्रोसिडींग ची अंमलबजावणी करण्यास विरोध दर्शविला परंतु सरपंच सारिका खिलारे यांनी जुलै 2023 च्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तहसीलदार मदन जाधव यांनी दिनांक 28 जुलै 2026 च्या पत्रानुसार पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे मंगळवेढा यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी होणारा बोकडांचा नैवेद्य उद्या शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
यात्रेच्या पार्शवभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी डोंगरगावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

