गडचिरोलीत शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे सुयश
गडचिरोली (अशोक खंडारे):-
बारावी विज्ञान शाखेत 96.89 टक्के निकाल लागला असून तन्यय किरंगे व तुषार ताकसांडे जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहेत
बारावी विज्ञान शाखेच्या जाहीर झालेल्या निकालात शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय ने पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल 96.89 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
महाविद्यालयातील तन्यय कुमारशाहा किरंगे व तुषार राजेश ताकसांडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 600 पैकी 536 गुण मिळवत 89.33 टक्के गुणांसह शाळेत तसेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
तर पूर्वा वसंत काटे हिने 512 गुण (85.33%) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. अस्मिता अनिल हुलके हिने 505 गुण (84.17%), प्रियल राजू गराटे हिने 496 गुण (82.67%), विनय जनार्दन पाल याने 494 गुण (82.33%) गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
याशिवाय गुंजन कैलास अलोने (80.50%), धनश्री लोमेश मेश्राम (78.50%), ओमकार चंद्रशेखर बारसागडे (78.17%), कांचन यशवंत मेश्राम (77.00%) यांनीही यशाची परंपरा पुढे नेली आहे
महाविद्यालयातील एकूण 322 परीक्षार्थ्यांपैकी 312 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 13 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 52 प्रथम श्रेणीत, तर 165 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या शानदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्राचार्य अरुण पाटील मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे

