अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश -- जिल्हा कार्यकर्ता बैठक संपन्न

0
अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश -- जिल्हा कार्यकर्ता बैठक संपन्न



 गडचिरोली (अशोक खंडारे)-- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ध्येयधोरण व नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यानी पक्षात प्रवेश घेतलेला असून जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
    रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली गडचिरोली येथील विश्राम गृहात संपन्न झालेल्या कार्यकर्ता बैठकीत हा प्रवेश जाहीर करण्यात आला व सर्वांचे पक्षाची सदस्य पावती आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
   पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनीता रायपुरे, वर्षा कन्नाके, माधुरी कोरवते, भास्कर गजभिये, अविनाश तुरे, निरंजन उमरे, मुरलीधर मेश्राम, शरद निकुरे आदींचा समावेश होता. सर्वांनी रिपब्लिकन पक्ष हा गोगरीब व सामान्य जनतेसाठी काम करणारा आणि नेहमी संघर्षरत राहणार राजकीय पक्ष असल्याने आपण या पक्षात काम करण्याचे ठरविले असल्याचे यावेळी जाहीर केले. 
   या बैठकीत जिल्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना रोहिदास राऊत यांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका व आंदोलनांचा इतिहास सांगितला आणि दलित शोषित जनतेचा आवाज उचलणारा हा पक्ष असून संघर्ष हेच रिपब्लिकन पक्षाचे दुसरे नाव असल्याचे सांगितले तसेच सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हा पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले 
   बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव राजन बोरकर, केशव सामृतवार, जिल्हासचिव प्रल्हाद रायपूरे, विधान सभा क्षेत्र प्रभारी प्रदीप भैसारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निता सहारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष क्रिष्णा चौधरी, तैलेश बांबोडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, सचिव पुण्यवान सोरते गडचिरोली तालूका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, सचिव अरूण भैसारे, आरमोरी अध्यक्ष तुळशीदास नंदेश्र्वर, जिल्हा संघटक हेमंत सहारे, महीला संघटिका डाॅ. अंकिता धाकडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, जेष्ठ कार्यकर्ता नामदेव खोब्रागडे चंद्रभान राऊत, दादाजी धाकडे, प्रेमेंद्र सहारे,लता येरमे व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 
        प्रदेश सचिव राजन बोरकर यांनी बैठकीचे संचलन केले तर जिल्हासचिव प्रल्हाद रायपूरे यांनी आभार मानले. बैठकीला जिल्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !