डोंगरगाव येथील मुस्लीम समाज मंदिर तात्काळ खुले करा : - डी.के. साखरे
डोंगरगाव (तालुका मंगळवेढा) :- सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत डोंगरगाव यांनी सील केलेले मुस्लीम समाज मंदिर तात्काळ खुले करा अशी मागणी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.के. साखरे यांनी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून त्याच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती मंगळवेढा व पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे मंगळवेढा यांनाही पाठविल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर जागेमध्ये व समाज मंदिरामध्ये मुस्लीम समाज नमाज पठण व त्यांचे अन्य धार्मिक विधी पार पाडत असून सध्या रमजान चा पवित्र महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत नमाज पठण करण्यास व धार्मिक विधी पार पाडण्यास अटकाव करण्याची सरपंच सारीका खिलारे
व ग्रामसेवक सुशांत कसबे यांनी घेतलेली भूमिका अयोग्य असल्याचे साखरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

