बसपा नगरसेविका हर्षला सावित्रीच्या वेशात,
बसपा तटस्थ, महापौरांना संविधान भेट
नागपूर:-
नागपूर मनपातील बहुजन समाज पार्टीच्या एकमेव नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल या आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करून हातात भारतीय संविधान घेऊन सुरेश भट सभागृहात उपस्थित झाल्या होत्या. त्यामुळे सर्व उपस्थितांचे व पत्रकारांचे त्यांच्याकडे लक्ष केंद्रित झाले. भाजपा काँग्रेस हे दोन्ही पक्ष बसपा साठी सारखेच असल्याने बसपा ने नेहमीसारखी तटस्थ ची भूमिका स्वीकारली.
हर्षला यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यांनी ती मात्र बसूनच स्वीकारली. यावेळी त्यांचे सोबत बसपाच्या माजी नगरसेविका वीरंका भिवगडे, संजय जयस्वाल, मोहम्मद जमाल, बसपा नेते उत्तम शेवडे, विलास सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.
नगरसेविका म्हणून बिजली, सडक, पाणी (बीएसपी) शिक्षण व आरोग्या सोबतच महापुरुषांच्या स्मारकाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे मनोगत हर्षला जयस्वाल यांनी याप्रसंगी व्यक्त केले. हर्षला ह्यांनी यापूर्वी दोनदा बसपाच्या नगरसेविका व सभापती म्हणून सुद्धा कार्य केले आहे.

