काटली येथे त्यागमुर्ती माई रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी
गडचिरोली (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
गडचिरोली तालुक्यातील काटली येथे त्यागमुर्ती माई रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती बौद्ध स्मारक समितीचे वतीने मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. प्रथमतः विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध व माता रमाई यांच्या प्रतीमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या प्रसंगी प्रामुख्याने बौद्ध स्मारक समितीचे सदस्य एस. डी. शिंपी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, गौतम खंडारे, प्रेमदास उंदिरवाडे , चंदू उंदिरवाडे, रज्जुताई उंदिरवाडे, गुंजन उंदिरवाडे,रोहिणी खंडारे, कलिना सोरते , भूमीताई उंदिरवाडे, रजनी उंदिरवाडे, विद्या उंदिरवाडे, यादनाबाई खंडारे, मिराबाई भैसारे, किरण शिंपी, मीराबाई शिंपी, इंदुबाई शिंपी, नम्रता उंदिरवाडे, गंधमाला उंदिरवाडे, ममता सोरते, यांच्या सह बहुसंख्य बौद्ध समाज उपासीका व उपासिक उपस्थित होते

