स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

0
स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी


आलापल्ली (अशोक खंडारे):-
स्थानिक आलापल्ली येथील स्व. लक्ष्मीबाई कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितेश बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला यावेळी आँनलाईन वक्ते म्हणून लाभलेले प्रा. डॉ. धर्मेंद्र तुरकर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि युवा यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा. राजेश गर्गम यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांवर संयुक्तपणे भाषण दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यामिनी बोदलकर  यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अविनाश रामटेके यांनी केले यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितेश बोरकर, प्रा. प्रिती नागपूरे, प्रा. लावण्या चेडे, प्रा. नेहा रुखमोडे आणि प्रा. अजय बारसागडे उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. विभाग, इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सेवकराम पाल, प्रा. खाडे, प्रा. कु. पारखी यांनी प्रयत्न केले.यावेळी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !