संघर्षाच्या प्रतीक म्हणजे माता सावित्री - प्रा. सुचिता खोब्रागडे

0
संघर्षाच्या प्रतीक म्हणजे माता सावित्री - प्रा. सुचिता खोब्रागडे 


आष्टी (अशोक खंडारे):-
संघर्षाच्या प्रतीक म्हणजेच माता सावित्री फुले असे प्रतिपादन प्रा. सुचिता खोब्रागडे यांनी आष्टी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती समारोह प्रसंगी मुख्य मार्गदर्शिका म्हणून केले. सावित्रीबाई फुले सार्वजनिक महिला मंडळाने आयोजित केलेल्या 
कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी ग्रामपंचायत सरपंच बेबीताई बुरांडे, सह उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, अध्यक्ष सौ. कांता मडावी, प्रमुख अतिथी उपसरपंच रेशमा फुलझले, ग्रामपंचायत सदस्य पुनम बावने, लाजवंती औतकार, विद्या जुनघरे ग्रामपंचायत सदस्य आशिष बावने, मुख्याध्यापीका सुनंदा गलबले, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा बुर्ले, दर्शीका बारसागडे, अर्चना निमसरकार, तनुशिला बारसागडे, धम्मदिप समाज मंडळ अध्यक्ष विनोद दुर्गे, कर्मचारी संघटना अध्यक्ष महेंद्र खोब्रागडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा सुचिता खोब्रागडे, डॉ. ज्योत्सना भागवत, प्रा. रुपेश निमसरकार आदि मान्यवर उपस्थित होते 
पुढे मार्गदर्शन करताना प्रा सुचिता खोब्रागडे यांनी महीलांचे अधिकार हिरावण्याचे प्रकार पुढे होणार आहेत त्याकरिता महीलांनी सजग राहून संघर्ष करण्यासाठी तत्पर राहीले पाहिजे असे मत व्यक्त केले
डॉ. ज्योत्स्ना भागवत व प्रा निमसरकार यांनी सुद्धा मौलीक असे मार्गदर्शन केले 
सदर कार्यक्रमात धम्मदिप समाज मंडळ आष्टी पालीभाषा स्पर्धेत प्राविण्य मिळवले तर. यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले सार्वजनिक महीला मंडळाचे अध्यक्ष प्रतिमा फुलझले, सचिव सुजाता देव्हारे, माधुरी झोडे, योगीता खोब्रागडे, इंदिरा गोंगले, मंगला अवथरे, ज्योती धुरके, यांच्या सह मंडळाच्या भगिणींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक माधुरी झोडे यांनी संचालन नवशाली दुर्गे तर आभार रजनी बावने यांनी मानले 
रात्रीच्या सुमारास निशाताई धोंगडे यांचा संगितमय प्रबोधन थाटात व मोठ्या हर्षोल्लासात पार पडला
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !