पहिल्याच राज्यस्तरीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धेत गोल्डन गर्ल श्वेता कोवे, अणू नैताम व मिथुन मडावी यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

0

पहिल्याच राज्यस्तरीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धेत गोल्डन गर्ल श्वेता कोवे, अणू नैताम व मिथुन मडावी यांची राष्ट्रीय स्तरावर निवड



आष्टी (अशोक खंडारे):-
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी ला सी. एम. इंटरनेशनल स्कूल बानेर, पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या 1 ली पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गडचिरोली ज़िल्यातील श्वेता भास्कर कोवे रौप्य पदक, अनु रघुपती नैताम रौप्य पदक व मिथुन परशुराम मडावी रौप्य पदक कंपाउंड व इंडियन राउंड प्रकारात वैयक्तिक पदके पटकावून वरील सर्व विजयी धनुर्धर खेळाडूंचे, पद्मश्री  मुरलीधर पेटकर यांचा शुभ हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले प्राप्त. सर्व खेळाडू हे खेलो इंडिया अंतर्गत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी मैदानावर नियमित सराव करीत असून या यशाबद्दल श्वेता भास्कर कोवे रौप्य पदक, अनु रघुपती नैताम रौप्य पदक व मिथुन परशुराम मडावी
यांचे वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव, आदरणीय बबलू भैया हकीम तसेच त्यांच्या सहचारिणी शाहीनभाभी हकीम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महा.आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई पर्यवेक्षक घाटबांधे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर श्याम कोरडे यांना दिले. त्याचबरोबर सुशील अवसरमोल,रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार 
यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सदर खेळाडू हे पटियाला पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत हे विशेष.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !