गडचिरोली येथे २५ जानेवारीला विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा जय विदर्भ!जय जय विदर्भ

0
गडचिरोली येथे २५ जानेवारीला विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा
        जय विदर्भ!जय जय विदर्भ!




गडचिरोली (अशोक खंडारे):-
 अखंड महाराष्ट्रात राहून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण होणार नाही, बालकांचे कुपोषण आणि गरोदर मातांची हेडसाळ थांबणार नाही, विदर्भाचा औद्योगिक विकास होणार नाही, वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षण यात सुधारणा होणार नाही , सिंचनाचा रस्त्याचा अनुशेष भरून निघणार नाही. कर्जबाजारी महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य आहे याचा साकल्याने विचार करून विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील पंधरा वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती याकरिता सातत्याने आंदोलन करीत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती याकरिता पुन्हा एक आंदोलन *विदर्भ निर्माण जन संकल्प लॉंग मार्च व मेळावा* रविवार दिनांक 22 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शहीद चौक नागपूर येथून लॉन्ग मार्च निघून दुपारी 2 वाजता चिटणीस पार्क नागपूर येथे विदर्भवाद्यांचा मेळावा संपन्न होत आहे याचा प्रचार व प्रसिद्धी करता संत तुकाराम सार्वजनिक वाचनालय,जिजाऊ चौक,पोटेगाव बायपास रोड,गडचिरोली येथे दिनांक 25 जानेवारी 2026 रोज रविवारला दुपारी 1 वाजता सभेचे आयोजन केलेले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख नेते एडवोकेट वामनराव चटप, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण भाऊ केदार, उपाध्यक्ष सुनील चोखारे, माजी मंत्री रमेशजी गजबे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, सुनील भोसले मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला विदर्भवादी जनतेने सहकाऱ्यासह उपस्थित असावे असे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकुर, अशोक पोरेड्डीवार, जिल्हा उपाध्यक्ष घिसु पाटील , शालिक नाकाडे, रमेश उप्पलवार, पांडुरंग घोटेकर, चंद्रकांत शिवणकर, पांडुरंग नागापुरे, प्रकाश ताकसांडे, गुरुदेव भोपये, वेणुदास वाघरे,महिला अध्यक्ष अमिता मडावी, सुनिता मडावी यांनी एका पत्रकातून केलेआहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !