गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्त्वात अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकरी धडकले चामोर्शी तहसिल कार्यालयावर
अतिवृष्टीने धान कापुस पिकांचे झाले मोठया प्रमाणात नुकसान शेतकरी हवालदील
हातातोंडाशी आलेला घास हीरावल्याने शेतकऱ्यांच्या. डोळ्यात अश्रू
हजारोंच्या संख्येत शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे.करुन नुकसान भरपाई देण्याची व कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी
चामोर्शी ( अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने धान कापूस व ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चामोर्शी तहसील कार्यालयावर धडक दिली. धान कापनीचा हंगाम सुरु असल्याने अतिवृष्टीमुळे धान पिक पूर्णतः पाण्याखाली गेले व पूर्णतः वापून गेले, तसेच कापसाचे बोंड गळून पडले त्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठे संकट कोसळले आहे.शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे.घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे.आपली आपबिती सांगत काळे पडलेले कापसाचे बोंड व वापलेले धान घेवून आम्ही जगायचे कसे असा प्रश्न उपस्थीत केला व नुकसान भरपाई सह कर्जमाफी करण्याची मागणी केली. यावेळी सदर मागण्यांचे निवेदन चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना दिले. यावेळी मोठया संख्येनी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली मार्गावरील तहसील कार्यालयाकडे जाण्याच्या मार्गावरुन मोठया संख्येत तहसील कार्यालयात प्रस्थान केले. व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. दुष्काळ ग्रस्त तालुक्यांच्या यादीत चामोर्शी व कोरची तालुक्याचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे तातडीने पंचनामे करण्यात येईल असे सांगत ईतर मागण्यासंदर्भात निवेदन शासनाकडे पाठविण्यात येइल असे आश्वासन दिले. यावेळी बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख असीद मिस्त्री, तालुका प्रमुख पप्पी पठाण, सरपंच नंदा कुळसंगे, उपसरपंच विठ्ठल आचेवार, अशोक मेळे, सपना मंडल, कपिल पाल, संतोष बारापात्रे, राजु एडलावार, अंतू तांगडे, छोटू दुर्गे, विजय बद्दलवार, विजय बहिरेवार, मारोती कन्नाके, विकास कन्नाके, राजु बोलगोडवार, सुनील निमरड, सुरेश चहारे, महेश चहारे, राजू तलांडे, विलास अपनवार, दिलीप चतुर, सुरेश औतकार , सुरेश वासेकर, बंडु कुबडे आनंद राव भोयर, सखाराम माडेमवार, प्रमोद बोलगोडवार, आदी मोठया संख्येने उपस्थित होते*

