सेवा पंधरवाड्यानिमित्त आष्टीत ग्राम पंचायत व पोलिस विभागाच्या वतीने स्वच्छता रॅली
आष्टी (अशोक खंडारे)##
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र सेवा पंधरवाडा दिवस आयोजित करण्यात आला होता . त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आष्टी येथे सेवा पंधरवाडा दिवस निमित्त ग्राम पंचायत व पोलिस विभाग यांच्या पुढाकाराने ग्राम स्वच्छता रॅली काढण्यात आली. व गावातील विविध वार्डातील कचरा साफ करण्यात आला.
येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय , महात्मा फुले हायस्कूल , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थी आंबेडकर चौकात एकत्र झाले .आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल काळे व सरपंच बेबी बुरांडे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.त्यानंतर ही रॅली आंबेडकर चौक ते पोलिस स्टेशन , हनुमान मंदिर , शिवाजी चौक ते परत आंबेडकर चौकात आली. याप्रसंगी ग्राम स्वच्छते बद्दल घोषणा देण्यात आल्या. रॅली दरम्यान पोलिस स्टेशन जवळील कचरा उचलून कचरा गाडीत टाकण्यात आला.
या रॅलीत पोलिस निरीक्षक विशाल काळे , सरपंच बेबी बुरांडे , उपसरपंच रेश्मा फुलझेले, ग्राम पंचायत चे सचिव बोगा , पत्रकार सुधीर फरकाडे , पोलिस उपनिरीक्षक वैशाली जगताप , पोलिस कॉन्स्टेबल वैभव हेडावू , मोहन लांबडे , गणेश ठमके , स्वाती चंदनखेडे , निखिल चौधरी , मुख्याध्यापक बोरकर , पर्यवेक्षक काळबांडे , सर्व शाळेतील शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , ग्राम पंचायत आष्टी चे कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

