एका इसमाने तलावात उडी घेऊन केली आत्महत्या

0
 
एका इसमाने तलावात उडी घेऊन केली आत्महत्या 


 बल्लारपूर : - एका तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना बामणी येथे घडली आहे 
बामणी येथे किरायाचे घरात राहत असलेल्या राहुल मधुकर फरकाडे वय ३६ वर्षे रा.विठ्ठलवाडा ता.गोडपिपरी हल्ली मुक्काम बामणी याने आज दि .३ आक्टोंबर सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या दरम्यान बामणी येथील तलावात उडी मारून आपले जीवन संपवले.
पोलीसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मागील रात्री पेपर मिलमध्ये पाळी ड्युटी करून आला होता. मानसिक तणावाखाली असलेला तो उपचारांत होता.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे व पो. अं. संदीप थेरे करीत आहेत. त्याचे कुटुंबीयांमध्ये वडील, पत्नी व ७ वर्षाचा मुलगा आहेत. या दु:खद घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !