बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे -भारतीय बौद्ध महासभेची मागणी. जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन

0
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे -भारतीय बौद्ध महासभेची मागणी. जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन  



     गडचिरोली (अशोक खंडारे):- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि. 17 सप्टेंबरला जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत मुख्यमंत्री बिहार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना निवेदन पाठविण्यात आले.
     1949 चा कायदा रद्द करून बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहारचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांकडे देण्यात यावे, महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावे या मागणीसाठी महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागारीक धम्मपाल, पेरियार रामास्वामी तसेच बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 17 सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
     यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, जिल्हा महिला शाखा अध्यक्ष सुरेखा बारसागडे, कोषाध्यक्ष लीना ढोलणे, जिल्हा हिशेब तपासणीस सुखदेव वासनिक, सम्यक जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे,सचिव प्रदीप भैसारे, सचिव ( प्रचार पर्यटन)बाळकृष्ण बांबोळे, रमेश डोंगरे,आत्माराम भानारकर,
सिद्धार्थ भानारकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
   

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !