गडचिरोलीच्या सारा स्वानाने घातली सुवर्ण पदकास गवसणी

0

गडचिरोलीच्या सारा स्वानाने घातली सुवर्ण पदकास गवसणी 



 गडचिरोली : पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील स्वान सारा ने आपल्या चपळाई व कार्यकौशल्याच्या जोरावर सुवर्णपदक पटकावित गडचिरोलीचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे.

१५ ते १९ सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या या मेळाव्यात
राज्यातील विविध विभागांकडून २५ संघ सहभागी झाले होते. पोलीसांचे कार्यकौशल्य वाढविणे, नवनवीन तंत्रज्ञानाची जाण करून घेणे आणि तपासातील कार्यपद्धती अधिक परिणामकारक करणे हा या मेळाव्याचा उद्देश होता. या पार्श्वभूमीवर स्वान पथक स्पर्धेमधील गुन्हे शोधक प्रकारात गडचिरोली पोलीस दलातील स्वान सारा हिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.

या मेळाव्यात स्वान पथक, सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही पद्धतींनी उमेदवारांचे मूल्यमापन करण्यात आले.

गडचिरोलीची सारा आता नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वान पथक गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार, स्वान हस्तक पोहवा /२१३४ राजेंद्र कौशिक, पोहवा /२३१४ अर्जुन परकीवार यांच्यासह सारा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !