महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा




आष्टी (दि. 24 सप्टेंबर) – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून स्वयंसेवकांनी जबाबदारीचे जाणीव ठेवून स्वतःमध्ये गुण विकसित करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
प्रास्ताविकातून प्रा. गजभिये यांनी एनएसएस स्थापना दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. गोंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. मुसने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे सामाजिक भान व कर्तव्य यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. खुणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला डॉ. शास्त्रकार, डॉ. कोरडे, प्रा. बोभाटे, प्रा. गभने यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा संचालन डॉ पांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुमारी मोनिका मुंजनकर हिने मानले.
कार्यक्रमानंतर परिसर व वर्ग स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा मंत्र अंगीकारून सामाजिक जबाबदारी जपण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !