रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण बिकट व गर्भवती महिलांचे आरोग्यही धोक्यात

0
रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण बिकट व गर्भवती महिलांचे आरोग्यही धोक्यात 




अहेरी. रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण बिकट झाले असून गर्भवती महिलांचे आरोग्यही धोक्यात आले आहे 
 अहेरी तालुक्यातील देवलमरी केंद्र शाळा अंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात एक किलो मीटर अंतर चिखलात हातात चप्पल घेऊन अनवाणी पायाने चिखल तुडवीत जावे लागते येथील चिमुकल्यांना शाळेत जाताना पावसाळ्यात हा त्रास होते पाय भरतात पाय घसरून पडणे अशी तक्रार पालक वर्गातून होत आहे 
आठशे लोकसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा आवारात अंगणवाडी केंद्र सुद्धा आहे अंगणवाडीत जाणाऱ्या गर्भवती महिला व लहान मुले तसेच याच रस्त्यावरून शेतात जाणारे शेतकरी व मजुर चिखलातून आवागमन करीत असताना पावसाळ्यात दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा अनेक अडचणीचा सामना सहन करावा लागत आहे मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मूलभूत सुविधा असणाऱ्या रस्त्याचा दुरावस्थेकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी तक्रार पालक वर्ग व नागरिकांकडून होत आहे या बाबतीत शासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत अशीही मागणी करण्यात आली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !