सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला "क वर्ग"चा दर्जा देण्यात यावा,आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
वनमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा
ता. प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे
अहेरी:-सुप्रसिद्ध चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम (देवस्थान) तीर्थक्षेत्राला क वर्ग चा दर्जा देण्याची मागणी आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बुधवार 16 जुलै रोजी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दरवर्षी महाशिवरात्रीला चपराळा येथे मोठी जत्रा भरत असते. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व अन्य राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दररोज येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु तीर्थक्षेत्राची जागा संस्थेच्या अधिनिस्त नसल्यामुळे देखभाल, दुरुस्ती व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी अडथळा आहे व विकास कामांना खिळ बसली आहे म्हणून तीर्थक्षेत्राची जागा क वर्गात समाविष्ट करून विकासकामांचे मार्ग मोकळे होण्यासाठी आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला बुधवार रोजी राज्याचे वन मंत्री ना.गणेश नाईक यांच्या दालनात महत्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली.
लवकरच विषय मार्गी लागून चपराळा येथील देवस्थान व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकासकामांना चालना मिळणार आहे.