अपघातात गंभीर जखमी तरुणास संजय पंदिलवार यांनी दिला मदतीचा हात
आष्टी:-
गोडपिपरीच्या समोरील वळणावर अपघात होऊन गंभीर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणास सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी मदतीचा हात देत मानुसकिचे दर्शन घडविले आहे
संजय पंदिलवार व त्यांचे सहकारी हे काही कामानिमित्त चंद्रपूरला आपल्या वाहनातून जात असताना गोंडपिपरी बकरा वळणावर योगेश तेलकुंटवार रा.आष्टी हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडून दिसले तेव्हा आपले वाहण थांबवून त्याला पाणी पाजले व शुद्धीवर आणून गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र व लागलीच त्यांच्या घरी दुरध्वनीद्वारे माहीती दिली गोंडपिपरी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास चंद्रपुर ला हलविण्यात आले त्यावेळी सानुग्रह मदत म्हणून पाच हजार रुपये दिले यावेळी संजय पंदिलवार सोबत देवा बोरकुटे व अक्षय निमरड होते
योगेश तेलकुंटवार हे दुचाकी जात असताना हरीण आडवे आल्याने अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे