गंभीर जखमी रुग्णाला नागपूर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच रुग्णवाहिकेने घेतला पेट.
गडचिरोली - एका गंभीर जखमी रुग्णाला सामान्य रुग्णालय गडचिरोली वरून नागपुरला १०८च्या रुग्णवाहिकेने नेत असतांना वाटेतच रुग्णवाहिकेने पेट घेतला परंतु चालकांच्या शर्तकतेमुळे रुग्ण, डॉक्टर व चालक बाल -बाल बचावले मात्र रुग्णवाहिका पेट घेतल्यामुळे नुकसान झाली. दि. २८ ला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रुग्ण अतुल लोणारे या जखमी रुग्णाला नागपुरला हलविण्यात येत असतांना दुपारच्या सुमारास उमरेड - भिवापूर रोडवर १०८ रुग्णवाहिका क्रंमाक एमएच १४ सी एल ०५१७ या राष्ट्रीय महामार्गावर गोंडबोरी जवळ रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला चालक संघशिल खुशाल उंदिरवाडे वय 30 रा. येनापुर यांच्या वेळीस लक्षात आल्याने गाडी थांबवुन रुग्ण, डॉक्टर यांना गाडीतुन सुखरूप बाहेर काढले क्षणार्धात रुग्णवाहिकेने पेट घेतला. अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले पोलीसही घटनास्थळी पोहचले त्यांनी शर्तीने प्रयत्न केला परंतु रुग्णवाहीकेने आगीचा डोंब घेत जळून खाक झाली. रुग्णवाहिकेत असलेला ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.