विषारी सापाने चावा घेतल्याने ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू

0
विषारी सापाने चावा घेतल्याने ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू 




आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली येथील एका इसमाला उजव्या हाताच्या मध्यमा बोटाला कोणत्यातरी विषारी सापाने चावा घेतला. त्यांना लगेच घरच्यांनी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांचेवर उपचार सुरू केले. व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना दिनांक २४ जूनला घडली.
येल्लया लचमय्या सोनमेनवार रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली (वय ६५) वर्षे असे मयताचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोडमपल्ली येथील येल्लया लचमय्या सोनमेनवार हे ता. २४ जून रोजीचे ०३:३० वाजताचे दरम्यान मृतक हे आभाळ झाल्याने झोपेतून उठून स्वतःचे राहते घराच्या अंगणातील चुंगड्यावर ताडपत्री टाकत असताना त्यांचे उजव्या हाताच्या मध्यमा बोटाला कोणत्यातरी विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्यांचेवर औषध उपचार केले. व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर येल्लया सोमनेमवार रा. चौडमपल्ली यांनी पोलिस स्टेशन आष्टी येथे तोंडी रिपोर्ट दिल्यावरुन पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे. पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात अंमलदार राजेश पोतराजवार हे पूढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !