संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्राप्त शेषराव गणवीर ( प्रहार तालुकाध्यक्ष) यांनी आपल्या मुलीला जि. परिषदेच्या शाळेत केले दाखल
जनतेमध्ये जाणीवजागृती करीता निर्माण केला एक आदर्श
तुमसर (भंडारा):-
दिनांक 23 जून 2025 ला शाळा प्रवेशोत्सव सण 2025 -26
"चला शाळेत जाऊया " या निमित्ताने तुमसर तालुकाध्यक्ष प्रहार संघटना शेषराव गणवीर यांनी आपल्या मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला व एक आदर्श जनतेपुढे ठेवला आहे
डॅा. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिनीच दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आज आपण पाहतो की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला प्रायवेट कॅान्वेन्ट मंध्ये शिकवतो. त्यांचा परिणाम जि.परिषदेच्या शाळेकडे कल पडतो आहे सध्या तरी दिसत आहे गणवीर दाम्पत्य उच्चशिक्षित असूनही ते जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण उच्चकोटीचे आहे म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला आहे
शेषरावजी गणविर यांनी एक निश्चिय केला की, आपल्या मुलीला जि.प. शाळेत शिकवायच, त्यांनी स्वतःच्या मुलीला जि.प. शाळा खापा (तुमसर) येथे दाखला करुन समाजाला एक सामाजिक संदेश दिला आहे की तुम्ही पण तुमच्या पाल्यांना शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवावे
आज शाळेचा पहिला दिवस, सर्व विध्यार्थांचे स्वागत करण्यात आले. व त्यांना पुष्पगुच्छ, पुस्तकं,गणवेश देण्यात आले,
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष नाना ठवकर, उपाध्यक्ष अण्णाजी वैद्य , सदस्य हलमारे ,ग्रा .प. सदस्य शैलेश कोल्हटकर , शेषराव गणवीर तुमसर तालुका प्रमुख (प्रहार संघटना)
तसेच जि.प.शाळेतील शिक्षक
सौ.ए .वाय. मोहरकर, एस. डब्ल्यू.खरवडे ,सौ व्हि.व्हि.मिसाळकर,सौ .एस के राणे,एस .एस .ढगे, सौ. .पी .आर .गिऱ्हेपुंजे ,
एस .बी .रठोड, प्रिया ठवकर, तथा पालकवर्ग व विध्यार्थी,विध्यार्थीनी उपस्थित होते.

