पाण्यासाठी आ.होळी यांना मार्कंडा (कं) येथील नागरिकांचे साकडे
मला पाण्याची समस्या कळविले असते तर ही तुमची पाण्याची समस्या केव्हाच मार्गी लागली असती तरीही तत्काळ सोडविणार - आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली :-
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा प्रभाग क्रमांक दोन येथे पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली असल्याने येथील ग्रामस्थांनी दि. २२ जानेवारी रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आ डॉ देवराव होळी यांची भेट घेऊन आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या सांगितली व पाणी समस्या सोडविण्याबात बोअरवेल देण्यात यावे असे निवेदनही दिले.
यावेळी नितीन बाहिरेवार, राजकुमार मुत्येलवार, अर्पित राऊत, राजू आलाम, रणजित राऊत, दीपक वाघाडे , प्रणव आत्राम आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांशी चर्चे दरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित ग्रामस्थांना मला तुम्ही भेटून आनंद झाला पण तुमची समस्या ऐकून नाराजी वाटत आहे आपल्या प्रभागात पाण्याची समस्या आहे तर आजपर्यंत मला का सांगितले नाहीत असे बोलून मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारले व आपली पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
आमदारांच्या आश्वासनाने मार्कंडा कंन्सोबा येथील निवेदन देण्याकरिता गेलेल्या ग्रामस्थांनी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आभार व्यक्त केले

