क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी
अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यचे दानशूर राजे म्हणून सुपरिचित,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या अहेरी विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब , रोगाने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या,अपघात ग्रस्त जनतेला नेहमीच आर्थिक मदत करीत असतात.त्यांनी आज सुध्दा सिरोंच्या तालुक्यातील जाणमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मदतीचा हात देऊन दानशूर असल्याचे परिचय करून दाखविले आहे
.महेश गट्टू काटेबाईना वय-20 वर्षे या युवकाचा काही दिवसांपूर्वी दुचाकी वाहनाने अपघात झाला त्या अपघातात त्यांना जबर मार लागल्याने उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती काटेबाईना कुटुंब मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतो.परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या कुटूंबात आर्थिक समस्या निर्माण झाली होती.
काटेबाईना कुटुंबाची ही आर्थिक समस्या राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली.त्यावेळी राजे साहेबांनी काटेबाईना यांच्या कुटूंबाला 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत केली.
सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन महेश गट्टू काटेबाईना यांच्या कुटूंबाला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिले.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते शंकर नरहरी,संपत दाया,शारुख पठाण,चंद्रशेखर चेम्मकारी,निखिल वेमुला,राजेश संतोषपू, शाम बेज्जनी,महेश जितबाईना,रामकृष्ण,रणजित बंडम,विशाल गाडीचेरला,अरविंद वे्मुला हे उपस्थित होते.

