एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाकडून अटक

0
 एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाकडून अटक




गडचिरोली:-
02 ते 08 डिसेंबर दरम्यान नक्षलवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.

दिनांक 06/12/2023 रोजी जहाल नक्षलवादी महेन्द्र किष्टय्या वेलादी, वय 32 वर्षे, रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छत्तीसगड) हा उपपोस्टे दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ 9 बटालियन जी कंपणीचे जवान व उपपोस्टे दामरंचा पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या नक्षलवाद्यांना माहिती पुरवीत होता. त्याचा 2023 च्या सुरवातीला झालेल्या कापेचंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिकायांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे. त्यानुसार त्यास उपपोस्टे राजाराम (खां) तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 397, 332, 353, 341, 324, 323, 120 (ब), 427,435, 143, 147, 148, 149, 506, 186 भादवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 07 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अन्वये गुन्हात अटक करण्यात आलेली आहे. अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
नामे महेंन्द्र किष्टय्या वेलादी

दलममधील कार्यकाळ

सन 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये कार्यरत असतांना माओवादी गावाजवळ आल्यावर सेंट्री ड्युटी करिता जाणे तसेच दामरंचा बाजारातून माओवाद्यांना (किराणा, भाजीपाला इ.) सामान पोहचविण्याचे काम करीत होता. तो सन 2010 पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (एम.) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता.
 त्यानंतर तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे चकमक - 02

माहे डिसेंबर 2017 मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग

माहे डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलीसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

जाळपोळ - 01

21 सन 2023 मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणाया रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचायांना मारहाण व त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्हात सहभाग.



शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

 महाराष्ट्र शासनाने महेन्द्र किष्टय्या वेलादी याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच पोलीस अधीक्षक यांनी नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !