दिव्यांगांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श बाळगून स्वतःमधील न्यूनगंड दूर करावेत - भगवान शहा आत्राम

0
दिव्यांगांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श बाळगून स्वतःमधील न्यूनगंड दूर करावेत - भगवान शहा आत्राम



सोपानदेव मशाखेत्री 
धानोरा:- 
दिव्यांगानी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श बाळगून स्वतःमधील न्युनगंड दुर करावे व आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन ग्रामविस्तार अधिकारी भगवान शहा आत्राम यांनी धानोरा येथील दिव्यांग सर्वांगीण संघटनेच्या व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश मारभते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विशेद खोब्रागडे, विलास मामीडवार, प्रकाश जेंगठे ,दिपक भैसारे आणि घुटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दीव्यांग जागतिक दिन व महापरिनिर्वाण दिन साजरा करताना सर्व दिव्यांगांनी आनंदाने फुले उधळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. आणि दिव्यांग प्रतिज्ञा घेतली. गरजू व्यक्ती रोहित विलास मेश्राम याला ट्रायसिकल ग्राम विस्तार अधिकारी आत्राम यांचे हस्ते करण्यात आली.
 गडचिरोली येथे 15. 12. 23 रोजी होणाऱ्या दिव्यांग मेळाव्यास सर्व दिव्यांगांनी आपल्या सहकार्यातून शंभर रुपये देणगी व एक पायली तांदूळ वर्गणीच्या रूपात गोळा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन गडचिरोली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे आवाहन दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारभते यांनी केले. संघटनेत दिव्यांगाची इत्यंभूत माहिती देण्यात आली असून ,लाभार्थ्यांना शेळी पालन, लघुउद्योगासाठी 10 हजार मदत देण्यात यावी असे ठरविण्यात आले. कार्यक्रमानंतर संघटनेच्या पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय गाठून दिव्यांगाचे मानधन वेळीच देण्यात यावे यासाठी नायब तहसीलदार आम्रपाली लोखंडे यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले. या कार्यक्रमात तालुक्यातील दिव्यांग पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल शिंपी यांनी केले तर आभार बारिकराव सहारे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !