गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा तात्पुरता रद्द

0
गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा तात्पुरता रद्द 





पुढची तारीख निश्चित होईस्तोवर वाटच पहात रहा 


गडचिरोली : -
 गडचिरोली जिल्ह्यातील ९ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा व प्रस्तावित कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. 
 अमित शाह यांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम ठरविले जातील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून दिल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामांचे व प्रकल्पाचे क्विझ भूमिपुजन, कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन, तसेच वडसा- गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाचे भूमिपुजन, चिचडोह बॅरेजचे लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही महत्वपूर्ण कारणाने दौरा पुढे ढकलावा लागला आहे 
यापूर्वी १८ नोव्हेंबरला शाह यांचा गडचिरोली दौरा होणार होता. परंतू तो निश्चित होण्याआधीच रद्द झाला होता. आता दुसऱ्यांदाच त्यांनी तारीख बदलविली आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असे विस्वासनीय सुत्रानुसार माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !