ज्ञानाच्या अथांग महासागराला आष्टी येथे अभिवादन

0
ज्ञानाच्या अथांग महासागराला आष्टी येथे अभिवादन


आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ज्ञानाच्या अथांग महासागराला अभिवादन करण्यात आले.
आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण धम्म दिप बौध्द समाज मंडळाचे अध्यक्ष अमित नगराळे यांचे हस्ते करण्यात आले तद्नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास धम्म दिप बौध्द समाज मंडळाचे सचिव पवन कुकुडकर, उपाध्यक्ष उतमचंद बारसागडे,पुतळा समितीचे अध्यक्ष सुंदरदास उंदिरवाडे, सरपंचा बेबीताई बुरांडे, उपसरपंच सत्यशील डोर्लीकर , सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार,धम्म चेतना बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष कवडू डोर्लीकर, सचिव अशोक खंडारे, कर्मचारी प्रबोधन संघटना अध्यक्ष प्रकाश डोर्लीकर, तमुस अध्यक्ष सुरज कुकुडकर, पोलीस पाटील विनोद खांडरे, ग्रा प सदस्य छोटू दुर्गे, पुणम बावणे, रेशमा फुलझले,अशोक साव, विलास कुकुडकर, यांच्यासह बहुसंख्य बौद्ध उपासक, उपासीका व ग्रामस्थ उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमाचे संचालन निकीता निमसरकार यांनी केले कार्यक्रमाची सांगता त्रिसरणं पंचशील ग्रहण करून करण्यात आली 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !