एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

0
एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला


 धानाच्या कडपा पुन्हा भिजल्या, बळीराजा चिंतातूर

अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड :- एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते आहे 
नागभीड तालुक्यात 28 नोव्हेंबर ला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उभे व कापलेले धानपिक पावसाने भिजले. त्या कापलेल्या धानपिकाच्या कडपा पलटवू पलटवू वाळत असतांनाच पुन्हा दि ५ डिसेंबर पासुन पावसाची रिमझिम सुरू झाल्याने वाळलेल्या धानाच्या कडपा पुन्हा भिजल्या त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने कमालीचा चिंताग्रस्त असल्याचे चित्रं पाहायला मिळतं आहे.
  नागभिड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांकडे जड धान जातीचे धानपिक लावले होते आता नुकतीच कापनीला वेग आला व कापणी करण्यात आले होते. तर अनेकांचे धानपिक कापुन शेतातच आहेत. मागील आठवड्यात झालेल्या धानपिकाने मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. पुन्हा कसेबसे धान पिक वाळविले मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने कापलेल्या सरड्या पाण्यात भिजत आहेत आणि धान्य कोंब सुध्दा येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असुन बळीराजा पुरता हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागभीड परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !