गडचिरोली येथिल अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदच्या वतीने नागपूर विधानसभेवर मोर्चा

0
गडचिरोली येथिल अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदच्या वतीने नागपूर विधानसभेवर मोर्चा


गडचिरोली:- 
आदिवासींच्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी हिवाळी अधिवेशनावर  आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा  (उलगुलान लाँग मार्च ) नागपूर  येथे दिनांक ११ डिसेंबर ला इंदोरा चौक ते विधानभवन येथे धडकला या उलगुलान लाँग मार्च मध्ये आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली येथील पदाधिकाऱ्यांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
हा उलगुलान लाँग मार्च आदिवासी बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार,  बोगसांची घुसखोरी या आदिवासींचा प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी अखिल आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष  लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली  दिनांक ५ डिसेंबर नाशिक सिन्नर गोंदे टोल नाका येथून निघत दिनांक ११ डिसेंबर विधानभवन मोर्चा नागपुर येथे धडकला.
धनगर जात किंवा कोणत्याही जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये,धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करण्यात यावी,धनगर जात व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे. तो हिवाळी अधिवेशनात जाहीर करून जनतेसमोर आणावा,पेसा ची पदभरती करण्यात यावी,2017 ची रखडलेली 12500 पदांची विशेष पदभरती करण्यात यावी,माननीय सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या 6 जुलै 2017 चे निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी,वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना आहारासाठी असलेली डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी. अन्यथा महागाईमुळे 10 हजाराने रकमेत वाढ करण्यात यावी, पंडीत दिनदयाल स्वयमं योजनेचे पैसे विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यावर 3 महिन्याच्या अगोदर मिळावे व त्या रकमेत महागाईमुळे 15 हजाराने वाढ करण्यात यावी,पंडीत दिनदयाळ स्वयम योजनेचा पैसा आदिवासी विभागातून धनगरांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये,शबरी वित्त व महामंडळ नाशिक यांच्याकडून राज्यातील आदिवासी बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी 10 लाख रुपये पर्यंतबिनव्याजी कर्ज देण्यात यावे,ज्या आदिवासी कलाकारांनी नृत्य, कलापथक यांनी आदिवासी जमातींची ओळख, कला, अस्मिता, अतित्व टिकवून ठेवली आहे त्या कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे,तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी मुला-मुलींची वस्तीगृहांची संख्या वाढवावी,मणिपूरच्या घटने संदर्भात झालेल्या आंदोलनावेळी सटाणा येथील आदिवासी मुलांवर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे,कंत्राटी पद्धतीचा शासन निर्णय रद्द करावा,जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करावे,डी लिस्टिंगच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजात भांडण लावून फूट पाडण्याचे कार्यक्रम रद्द करावे व आदिवासींची दिशाभूल करणारे कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अश्या मागण्यासाठी हा लाँग मार्च नाशिक ते विधानभवन येथे काढण्यात आला होता.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, संपर्कप्रमुख बादल मडावी, मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट, चामोर्शी तालुका उपाध्यक्ष सुमित कुमरे, तालुका संघटक विनोद मडावी, डेव्हिड पेंद्राम, कैलाश गेडाम,अक्षय वाढई, पृथ्वी मडावी,गिरीश जोगे,सुरज आलाम,नागेश वंरशे,रोहन आत्राम यांच्यासह इतर कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !