कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा नाट्यश्री साहित्य कला मंच द्वारे सन्मान

0
कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा नाट्यश्री साहित्य कला मंच द्वारे सन्मान.




गडचिरोली : 
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कवी , लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा नाट्यश्री साहित्य कला मंच कडून नवयुवक कवी म्हणून सन्मान करण्यात आला
नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली आयोजित "रानगर्भ" फुलत आहे पुस्तक प्रकाशन सोहळा व कविसंमेलन दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी लहुजी मडावी सभागृह गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्मीकार कवी तथा साहित्यिक प्रभाकर तांडेकर होते तरप्रमुख अतिथी म्हणून नाट्य समीक्षक तथा रंगकर्मी प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर, साहित्यिक प्रभाकर तांडेकर, काव्य समीक्षक प्राचार्य राजेंद्र कांबळे, काव्य समीक्षक प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम, जंगल कामगार सहकारी संस्था अध्यक्ष घनश्याम मडावी,३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लेनगुरे, संपादक,नाटककार व नाट्यकर्मी चुडाराम बल्लारपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कविसंमेलनात राज्यभरातील वरिष्ठ कवी, कवयित्रींची उपस्थिती होती. सर्व कविवर्यांनी संमेलनात आपापल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. त्यात अती दुर्गम भागात राहणारे गडचिरोली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (चक) या खेळेगावचे राहणारे युवाकवी प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता. त्यांनी आपली स्वरचीत विरह कविता ''श्वासातून फुटल्या आर्त किंकाळ्या" सादर करून सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य व मान्यवरांची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली म्हणून त्यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व राज्यभरातील कवीवर्यानी, मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच या सत्कार व यशाबद्दल त्यांचे साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी प्रशंसा केली आहे व शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !