आष्टी येथे मार्कंडा (कं) केंद्राचे हमी भाव धान खरेदी केंद्र आ. देवराव होळी याच्या हस्ते उद्घाटन
अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे दि . १६ डिसेंबर ला मार्कंडा (कं) केंद्राचे हमीभाव धान खरेदी केंद्र याचे उद्घाटन आ. डॉ देवराव होळी यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले
या प्रसंगी प्रमुख अतीथी उपप्रादेशिक अधिकारी एस. के. भगत घोट , सामाजीक कार्यकर्ता संजयभाऊ पंदिलवार आष्टी, एन.एम.एल. प्रतिनिधी पंकज चलाख , उप. व्यवस्थापक प्रभारी अधिकारी व्यंकटी लाटकरी घोट, विपणन निरीक्षक के.बी.झाडे मार्कंडा (कं) शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे गडचिरोली उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर आष्टी, उपसरपंच वसंत चोधरी ग्रा .प.अनखोडा,जिल्हा सरचिटनिस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली प्रणय बुर्ले, सामाजीक कार्यकर्ता देवा बोरकुटे आष्टी,तसेच टी.डी.सी. खरेदी केंद्र मार्कंडा (कं) केंद्राचे केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले घोट यांच्या उपस्थीतीत हमीभाव धान खरेदी केंद्राचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन करून धान खरेदीला सुरवात करण्यात आली या वेळी शेतकरी तसेच उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी वृंद व केंद्रप्रमुखाचे सहाय्यक प्रामुख्याने उपस्थित होते आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासन निर्णयानुसार चामोर्शी तालुक्यातिल शेतकरी कुठल्याही केंद्रावर धान विक्री करू शकतात त्या प्रमाणे केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री पासून वंचित ठेवले जाणार नाही व प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांना धान विक्री करता येईल असे उदघाटनाच्या वेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी टी. डी. सी खरेदी केंद्र मार्कंडा (कं )केंद्राला निर्देश दिलेले आहेत

