शेतकऱ्यांना पुरक शेती अल्प खर्चात करने म्हणजे नैसर्गिक व जैविक ह्याच प्रकारे - ऋषी सहारे

0
शेतकऱ्यांना पुरक शेती अल्प खर्चात करने म्हणजे नैसर्गिक व जैविक ह्याच प्रकारे - ऋषी सहारे 




आरमोरी - :
 सध्याच्या रासायनिक शेतीच्या तुलनेत जैविक व नैसर्गिक शेतीच शेतकऱ्यांना पूरक असून कमी खर्चिक शेती असल्याचे प्रतिपादन शेतकरी मेळाव्यात मुख्य जैविक शेती मार्गदर्शक ऋषी सहारे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सांगितले
 आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व विहीरगाव इथ अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली व अफार्म पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोरडवाहू शेतकऱ्यांनाकरिता  शेतकरी मेळावा घेण्यात आले. दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी कोरेगाव इथ तर १७ डिसेंबर २०२३ रोजी विहीर गाव इथ शेतकरी मेळावा आयोजित करून  हवामानाकुल अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रकल्प अंतर्गत अल्प भू धारक कोरडवाहू शेतकरी यांना अल्प खर्चिक शेती तंत्र ज्ञानविषयी क्षमता वर्धन व्हावे व कोरडवाहू भागातील छोट्या, अल्प भू धारक शेतकऱ्या पर्यंत अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान पोहचविणे व रब्बी हंगामासाठी मार्गदर्शन केले. 
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती, गांडूळखताचे महत्व, दशपर्णी, जिवामृत उपयोगाचे महत्त्व विषद करण्यात आले.  
यावेळी दोन्ही ठिकाणी उद्घाटक म्हणून तेथील सरपंच होते तर अध्यक्ष स्थानी तेथील पोलीस पाटील होते.
मुख्य मार्गदर्शक म्हणून ऋषी सहारे आणि ढोलणे व मेश्राम तालुका कृषी सेवक हे होते. सुनील नंदनवार, बालाजी गेडाम सरपंच, ओमप्रकाश मडावी पो पा., गेमराज टेंभुर्ने उपसरपंच, खुशाल बावणे, कविता दर्रो, सदस्य,परसराम मडकाम अध्यक्ष - तंटामुक्त समिती कोरेगाव, विहीरगाव- जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात - खुशाल वेलादे सरपंच, सौ.रुपकला मडावी  पोलिस पाटील, मंगेश चापले  प्रगतीशील शेतकरी गणेशपुर,सौ.दामिनी पोटे सदस्य, आशा पेंदाम उमेद प्रतिनिधी
व  बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्वीते करिता निकेश ताडाम, प्रेमिका कुमोटी, मंदिरा किरंगे, राहुल मडावी सहकार्य केले.
संचालन, प्रास्ताविक व आभार अकील शेख सचिव अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !