आईने पोटच्या मुलाला विष पाजले व स्वतःलाही संपवलं

0
आईने पोटच्या मुलाला विष पाजले व स्वतःलाही संपवलं 


अमरावती:-
अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 12 वर्षीय मुलाला विष पाजून स्वतःही विष घेतलं आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमरावती शहरातील हमालपुरा येथे ही घटना घडली आहे  योगिता वाघाडे वय ३४ वर्ष व अर्थव वाघाडे वय १२ वर्ष असं मृतक मायलेकांचे नाव आहे. पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर उदरनिर्वाहाच्या ओढातानीने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा तर्क लावला जातो आहे. गरिबीच्या परिस्थितीत मुलाचं संगोपन होत नसल्याने आईने मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !