आष्टी येथे पोलीस स्टेशनचा भव्य जनजागरण मेळावा, व्हॉलीबॉल स्पर्धा व कबड्डी स्पर्धा

0
 आष्टी येथे पोलीस स्टेशनचा भव्य जनजागरण मेळावा, व्हॉलीबॉल स्पर्धा व कबड्डी स्पर्धा



आष्टी:-
 गडचिरोली जिल्हा पोलीस दला अंतर्गत दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस स्टेशन आष्टी येथे भव्य जनजागरण मेळावा व व्हॉलीबॉल स्पर्धा, कबडडी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सदर मेळावा व स्पर्धा हे पोलीस अधिक्षक निलोत्पल ,अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे, चितां, देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनातून घेण्यात आला. हा कार्यकम महात्मा ज्योतीबा फुले हॉयस्कूल आष्टीच्या प्रांगणात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक कुंदन गावडे प्रमख पाहुणे सरपंच सौ. बेबीताई बुरांडे आष्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ.
दामोधरे आष्टी म्हणुन उपस्थित होते. सदर मेळाव्यात दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोस्टे हद्दीतील नागरीकांकडून पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड इत्यादी प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी प्रकीया पुर्ण करूण हद्दीतील एकुण ८८नागरीकांनी सदर मेळाव्याच्या अनुषंगाने लाभ घेतला. आदिवासीची संस्कृती असणारे वृक्ष संवर्धनाच्या दिशेने एक पाडुल म्हणुन पोलीस स्टेशन आष्टी च्या वतीने उपस्थितांना एकुण १५० वृक्ष वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात ग्रामिण रूग्णालय आष्टीच्या वतीन मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबत किडा स्पर्धामध्ये कबड्डी आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धामध्ये कबड्डी स्पर्धेत मौजा चंदनखेडी (खर्डी) संघ विजयी झाला तसेच घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मौजा चौडमपल्ली संघ विजयी ठरला.



मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले 
 घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये कबड्डी मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक चंदनखेडी, व्दितीय कमांक आष्टी, तृतीय क्रमांक आष्टी नोकेवाडा, व व्हॉलीबॉल मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक चौडमपल्ली, व्दितीय क्रमांक मार्कडां कं., तृतीय क्रमांक एम.जे.एफ. क्लब आष्टी यांनी पटकावला. मेळावा यशस्वी करण्यासाठी आष्टी पोलीसांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !