पंतप्रधान मा. मोदीजी महाराष्ट्रतील शेतकऱ्यांच्या धानाला छत्तीसगढ़च्या जाहिरनाम्या प्रमाने धानाला भाव द्याल काय?
गडचिरोली:-
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धानाला छत्तीसगढ़च्या जाहिरनाम्या प्रमाने भाव द्याल काय?
छत्तीसगढ राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे सारंगठ जिल्हा व राज्यात प्रत्येक चैकाचैकात मोठमोठ्या होर्डींग्ज मध्ये त्या राज्यातील शेतकऱ्यांना भुरळ घालण्यासाठी धानाला शासकीय दर प्रती क्विंटल ३१०० रुपये भाव, व प्रती क्विंटल ३०० रुपये बोनस तसेच शासकीय धान्य खरेदी करताना प्रती एकर २१ क्विंटल येवढे शेतकऱ्यांना विक्री करता येईल
छत्तीसगढ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या धानाला सदर भाव देणार काय असा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो आहे धानाला सदर भाव दिल्यास शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून शेतकऱ्यांची चिंता दुर होईल.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करतो आहे कधी अती वृष्टी मुळे, तर कधी पावसाअभावी पीक नष्ट होण्यामुळे, तर कधी किडींच्या प्रादुर्भावामुळे, नापिकीमुळे अश्या विविध कारणांमुळे त्यामुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत धान पिकाला हमीभाव निश्चित छत्तीसगढ प्रमाने भाव द्यावे तेव्हा शेतकरी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडेल
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना आताच हे भाव देण्याची सरकारने तसदी घ्यावी अन्यथा निवडणूक आली की असे आश्वासन म्हणजे जुमलाच होणार हे निश्चित आहे

