नागपूर:-
राज्यात परीक्षा होऊन काही दिवस झाले आहेत. मात्र अजूनही निकालाचा तपास नाही. रात्रीचा दिवस करणारे अभ्यासू मुलं निकाल कधी लागणार ही आशा घेऊन जगत आहेत. भरतीच्या परीक्षा जुलै ते सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत. मात्र नोव्हेंबर संपत आला तरीही परीक्षेचा निकाल लागला नाही. परीक्षा देऊन लाखोंच्या संख्येने विद्यार्थी निकालाची वाट पाहत संतापले आहेत. आता निकाल कधी लागणार याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
तलाठी पदासाठी ११ लाख अर्ज आले होते. तर दुसरीकडे वनविभागासाठी साडे पाच लाख अर्ज आले आहेत. असे इतरही सहा विभागांमध्ये अर्ज आले होते. यामध्ये आता एकूण २५ लाख उमेद्वारांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये तलाठी पशुसंवर्धन वनविभाग अर्थ संख्यांकी आणि कृषीविभागाच्या परीक्षा झाल्या आहेत मात्र अजूनही निकाल लागला नाही. यावर विजय वडेट्टीवारांनी सरकारला सुनावले आहे.
तलाठी पद भरती परीक्षा पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा
वन विभागातील पद भरती परीक्षा
अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा कृषी विभागातील पद भरती परीक्षा
अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार
तलाठी पद भरती परीक्षा पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा वन विभागातील पद भरती परीक्षा अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा कृषी विभागातील पद भरती परीक्षा अशा पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल हे काही महिन्यांपासून रखडले आहेत. ज्यामुळे २५ लाख उमेद्वार निकालासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही.
सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले सबुरीचे गाजर आहे, असे वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

