भर रस्त्यावर तलवारीने केक कापणा­ऱ्या तरुणांना आरमोरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

0
भर रस्त्यावर तलवारीने केक कापणा­ऱ्या तरुणांना आरमोरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या 


चार तरुणांना अटक तर एक फरार

आरमोरी:-
 भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना आरमोरी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणा­ऱ्या मार्गावर काल दि. 25 नोव्हेंबर ला रात्री १२ ते १.०० वाजताचे दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ/आरडा ओरड करत असतांना दिसून आल्याने त्याच्या जवळ जावून चौकशी केली असता दुचाकीच्या सीट वर केक ठेवुन तलवारीने केक कापत असतांना तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणन्याचे उद्देशाने तलवार सहित मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कार्यवाही मध्ये एक धार धार टोकदार तलवार अंदाचे किंमत 1500/- रुपये, एक जुनी वापरती पांढ­या रंगाची ॲक्टीवा 6 दुचाकी नंबर एम. एच. 33 ए.ए. 1340 अंदाजे किंमत 55000/-रु., एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस दुचाकी क्र एम.एच 33 वाय 7854 अंदाजे किंमत 40,000/- असा एकुण अंदाजे 96,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्हयातील आरोपी लोकेश विनोद बोटकावार वय 21 वर्ष, लोकमित्र खुशाल ठाकरे वय 25 वर्ष, बादल राजेंद्र भोयर वय 23 वर्ष, पवन मनोहर ठाकरे, वय 25 वर्षे व फरार आरोपी नामे राहुल मनोहर नागापुरे वय 28 वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली वरील नमुद आरोपीतांच्या विरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील परि.पोउपनि संतोष कडाळे हे करीत आहेत.
 सदरची कार्यवाही प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदिप मंडलीक व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !