पुन्हा आष्टी पोलीसांनी पकडली अवैध देशी दारू, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

0
पुन्हा आष्टी पोलीसांनी पकडली अवैध देशी दारू,
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त


आष्टी,
पून्हा आष्टी पोलीसांनी अवैध देशी दारू पकडली असून अवघ्या दहा दिवसांत अवैध दारू तस्करीची तिसरी कारवाई करण्यात आष्टी पोलीसांना यश आले आहे.
छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकच्या अनुषंगाने चोराटी होणारी दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक यांनी आदेक्षित केले असून त्या अनुषंगाने काल १ नोव्हेंबर रात्री 22.00 वाजता गोपनीय माहिती द्वारे माहिती प्राप्त झाली की एका चार चाकी वहाणा मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात कोनसरी  मार्गे चोराटी दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने कोनसरी टी पॉईंट येथे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी केली असता एक संशयित वाहण MH - 31  CR/ 9319 स्विफ्ट डिझायर कार  ला अडवून   पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये देशी दारू 1,20, 000/- रूपयांची व वाहन 3 लाख 80,000/-  रुपये असा एकूण 5,00, 000/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. वाहन चालक दिपक रेड्डी रा.चंद्रपूर  याचे वरती गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.
 सदरची कामगिरी हि  पोलिस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग)  यतीश देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  कुंदन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक  सोमनाथ पवार , पो. हवा.  निमसरकार , पो. शि. राजुरकर, रायसिडाम, तोडासे यांनी पार पाडली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !