कार्तिक पौर्णिमा निमित्त श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथे गोपाल काला व दमा औषधीचे वितरण

0
 कार्तिक पौर्णिमा निमित्त श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथे गोपाल काला व दमा औषधीचे वितरण 


कै. नानाजी मारोतराव पंदिलवार व कै. अनुसयाबाई नानाजी पंदिलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत दमा औषधी वितरण


आष्टी :-
 तालुक्यातील आष्टी येथून जवळच असलेल्या श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक मासिय गोपाल काला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घटस्थापना होणार असून सार्वजनिक भजन मंडळ दरुर यांचे भजन होणार आहे तर दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी व सायंकाळी सहा वाजता महाआरती, व जय बजरंग बली भजन मंडळ कुनघाडा माल येथील भजन व दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी व सायंकाळी सहा वाजता महाआरती व भजनाचा कार्यक्रम व दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी व सायंकाळी सहा वाजता महाआरती व रात्री गुरूदेव भजन मंडळ ईल्लूर येथील भजन व दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी महाआरती दुपारी १२ :०० वाजता गोपालकाला व महाप्रसाद तसेच २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:०० वाजता कै. नानाजी मारोतराव पंदिलवार व कै. अनुसयाबाई नानाजी पंदिलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुमार आयुष संजयराव पंदिलवार आष्टी यांच्या सौजन्याने मोफत दमा औषधी वितरण करण्यात येणार आहे. दिनांक २७ नोव्हेंबर रोजी श्री संत मुरलीधर महाराज हरणघाट यांचे तर्फे ब्र.प. पुज्य कार्तिक स्वामी महाराजांची पालखी हरणघाट वरून प्रस्थान करुन घारगाव,रामाळा, मार्कंडा देव,चाकलपेठ,मुरखळा,कान्होली हेटी, लखमापूर बोरी,भिक्शी, किष्टापुर,सेलूर,गणपूर,मुधोली रीठ,मुधोली तुकूम, जैरामपूर,कढोली अनखोडा, आष्टी, ईल्लूर,ठाकरी,कुनघाडा मार्गे चपराळा देवस्थान येथे दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आगमन व पूजन होईल करीता या होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने भक्तगण उपस्थित राहुन कार्तिक मासिय गोपाल काल्याचा लाभ घ्यावा असे संचालक मंडळ श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा यांनी कळविले आहे.
मोफत दमा औषधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कुमार आयुष संजयराव पंदिलवार आष्टी यांनी केले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !