परिसरातील नागरिकांनी केली मागणी
प्रमोद झरकर / उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
मो.न. ९३२५७६६१३४
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तज्ञ MBBS डॉक्टर ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे
सदर आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत ३३ गावे येतात या गावातील गोरगरीब रुग्न येनापूर येथेच उपचारासाठी येत असतात परंतू तज्ञ डॉक्टर अभावी बरोबर उपचार होत नसल्याने खासगी डॉक्टरांकडे इतरत्र न्यावे लागते त्यामुळे गोरगरीब रुग्णांना हा नाहक खर्च सहन करावा लागत आहे.
या आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे वेळेवर उपचार होत नाहीत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांची रिक्त पदे सुद्धा तात्काळ भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच तज्ञ डॉक्टर MBBS ची अतिशिघ्र पुर्तता करावी अशी मागणी परिसरातील 33 गावातील नागरिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

