गणरायाचे विसर्जन करतांना तिन युवकांना जलसमाधी
सावली येथील दुर्देवी घटना
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९
सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील जय बजरंग गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला दोघांचा अजून पत्ता लागला नाही मात्र त्याला रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे. ही दुर्देवी घटना सावली तालुक्यात गणेश विसर्जनाच्या दरम्यान घडली.
सावली शहरातील सावलीचा राजा, सावलीचा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ असे तीन सार्वजनिक गणेशाचे विसर्जन दिनांक 30 ला करण्यात आले. तिन्ही गणपती सावली शहराच्या प्रमुख मार्गाने आनंदात, नाचत गाजत विसर्जन स्थळी आले. त्यापैकी राजा व विघ्नहर्ता हे दोन गणपती हे स्थानिक लहान तलावामध्ये विसर्जन केले तर एक जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करण्यासाठी नेले गणपती विसर्जन करतांना नहराच्या पाण्याच्या प्रवाहात जवळपास 5 युवक बुडाले मात्र त्यातून 2 जण बाहेर सुखरूप निघाले परंतू
चांदली येथील गुंडावार बंधू व गुरुदास दिवाकर मोहुर्ले हे वाहून गेले. गणपती विसर्जन केल्यावर काही युवक बाहेर आले नाही हे दिसताच गणेश मंडळाचे युवक हळबळले आणि त्यांना शोधण्यासाठी काही युवकांनी नहरात उड्या मारल्या आणि शोध कार्य सुरु होते मात्र त्यात गुरुदास मोहुर्ले हा युवक सापडला. व गुंडावार बंधू वाहून गेले. लहान भावासाठी मोठ्याने मारली उडी चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू विसर्जन साठी या ठिकाणी होते. प्रवाहात भाऊ संदीप वाहून गेल्याचे कळताच त्याला शोधण्यासाठी मोठा भाऊ निकेश ने वाचवण्यासाठी उडी मारली मात्र पाण्याच्या प्रवाहाने दोघेही अजून सापडले नाही. शोध कार्य सुरू आहे

