दिना नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
क्रिष्णा गावडे /तालुका प्रतिनिधी अहेरी वैनगंगा वार्ता १९
अहेरी :-
अहेरी तालुक्यातील दिना नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे
सदर घटना दि.२९/९/२०२३ ला उघडकीस आली.
अहेरी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह अहेरी उप जिल्हा रुग्णालयात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे
सदर मृतक इसमास कुणी ओळखत असल्यास किंवा लापता असलेल्या इसमाच्या नातेवाईकांनी अहेरी येथे जाऊन खात्री करून घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे
अधिक तपास अहेरी पोलीस करीत आहेत.

