पत्नीला वाचविताना कुलर चा शॉक लागून पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर

0
पत्नीला वाचविताना कुलर चा शॉक लागून पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर


गडचिरोली :-
 कुलरचा शॉक लागून पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारला सायंकाळी 4.30 वाजता गडचिरोली शहरातील राममंदिर परिसरात घडली. गजानन रघुनाथ टेकाम (60), असे मृतक पतीचे तर रसिका गजानन टेकाम (वय 50 रा. रामपुरी वॉर्ड गडचिरोली), असे जखमी पत्नीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील रामंदिर परिसरातील रहिवासी रसिका टेकाम रविवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास कुलरजवळ काम करीत होत्या. दरम्यान त्यांच्या साडीचा पदर कुलरच्या पंख्यात अडकला. त्यामुळे कुलर त्यांच्या अंगावर पडली. त्यामुळे पत्नीने आरडाओरड करताच जवळच असलेले पती गजानन टेकाम हे पत्नीला वाचविण्यासाठी धावले. ते चालू कुलर उचलायला गेले असता, दोघांनाही विद्युत शॉक लागला. लागलीच दोघांनाही शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले.
मात्र गगजान चा मृत्यू झाला व  रशिका गंभीर आहे असे वृत्त देण्यात आले आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !